Home हेल्थ उसाचा रस प्यायला तुम्हालाही आवडत असेल मग ते पिण्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्या

उसाचा रस प्यायला तुम्हालाही आवडत असेल मग ते पिण्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्या

by Patiljee
356 views

उसाचा रस प्यायला सगळ्यांनाच आवडते अत्यंत मधुर असा उसाचा रस कोणाला नाही आवडणार. आपण जास्त करून मार्च ते मे या महिन्यात उसाचा रस जास्त पित असतो कारण त्यावेळी आपल्याला पाणी जन्य पेयांची जास्त गरज असते. पण काही लोक अशीही असतात जे सर्व सिजन मध्ये हा रस पितात. आपण बाहेर मिळणारे कोल्ड्रिंक्स पित असतो पण त्यात असणारे केमिकल हे आपल्या शरीरातील खूप घातक असतात त्यामुळे नैसर्गिक प्रकारे बनवलेले सरबत कधीही चांगलेच असते ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे.

तसेच उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक असतात. गर्भवती स्त्रियांसाठी ही खूप उपयोगी आहे हा रस उसाचा रस फक्त तुम्हाला गर्मीपासून बचाव करत नाही तर बर्‍याच आजारपणापासून तुम्हाला दूर ठेवतो. तसेच हा रस प्यायल्याने मधुमेही रोग्यासाठीं ही फायदेशीर आहे. शिवाय हा रस पिल्याने डीहायड्रेशनपासून तुमचा बचाव होतो. उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशनची भिती सतत असते.

कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅगनीजने भरपूर उसाचा रस इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता पूर्ण करतो.  एंटीऑक्सीडेंटनेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे यात असणारे फ्लेवोन हे घटक कँसर कोशिकांनाच्या प्रसार थांबवते. उसाचा रस पिताना आपण नेहमी काळजी घ्यायला हवी जेणेकरून त्यापासून आपल्या पोटाला काही विकार व्हायला नको. म्हणजे रस बनवण्यासाठी वापरणारे पाणी स्वच्छ आहे का, त्यासाठी वापरण्यात येणारे बर्फ नीट ठेवले आहे का? त्यावर माशा तर बसत नाहीत ना, अशा लहान सहान गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तसेच उसाचा रस मशीन मधून काढल्यावर लगेच प्या जास्त वेळ ठेऊ नये किंवा या रसामध्ये इतर कोणतेही पेय मिसळू नका. दिवसातून जास्तीत जास्त दोन ग्लास रस पिणे हे उत्तम आहे आपल्या शरीरातील उगाच हद्दिपेक्षा जास्त पिणे कोणतीही गोष्ट आपल्या शरीरातील वाईटच.

Please follow and like us:

Related Articles

2 comments

गुणकारी आणि रोजच्या आहारातील कोकम बघा किती उपयोगी आहे » Readkatha July 2, 2020 - 1:06 pm

[…] माहीत नसतात. आपल्याला कोकणचे फक्त सरबत, सोलकढी भाजीत घालायचे कोकम इतकच माहीत […]

Reply
गूळ खाण्याचे फायदे » Readkatha July 26, 2020 - 5:57 pm

[…] बनवतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर उसाचा रस आटवून गूळ तयार केले जाते. गुळामध्ये […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल