Home हेल्थ चेहऱ्यावर लावा बर्फ आणि मिळवा सुटका चेहऱ्याच्या अनेक अडचणी पासून

चेहऱ्यावर लावा बर्फ आणि मिळवा सुटका चेहऱ्याच्या अनेक अडचणी पासून

by patiljee
22083 views

चेहऱ्यावर आपण अनेक प्रकारचे लेप लावतो जेणेकरून आपला चेहरा चमकावा, पण काही वेळा अशा ही गोष्टी करून बघा ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुळेल. आज आपण चेहऱ्यावर बर्फ लावण्याने काय काय फायदे होतात ते पाहूया. सध्या तरी गरमी खूप वाढली आहे, त्यामुळे आपण थंड पाणी पितोच पण त्याचबरोबर बर्फ ही चेहऱ्यावर फिरवा आणि मिळवा सुंदर त्वचा तर चला पाहूया बर्फाने कोणकोणते लाभ आपल्या चेहऱ्याला मिळत असतात.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बर्फ फिरवताना तो प्रत्यक्षपणे आपल्या चेहऱ्यावर फिरवू नये. त्यासाठी एक पातळ कपडा घ्या, त्यात बर्फ ठेवा आणि हे बर्फ चेहऱ्यावर फिरवा. नुसता बर्फ चेहऱ्यावर फिरवू नका त्यामुळे तुमचा चेहरा लाल होऊ शकतो.

बर्फ लावल्याने तुमचा चेहरा जास्त काळ टवटवीत राहतो. शिवाय काळी वर्तुळे ही नाहीशी होतात. पण ही काळी वर्तुळे जाण्यासाठी बर्फ वेगळा तयार करा त्यासाठी गुलाब पाणी आणि काकडी यांचा रस मिसळा आणि हा रस एकत्र बर्फाच्या साच्यात ठेवा ह्या बर्फाच्या खड्याणी त्या ठिकाणी एक दिवस नाही तर नियमित घासा..

तुमच्या चेहऱ्यावर सतत घाम येत असेल आणि त्यामुळे तुमचा मेकअप बिघडून जात असेल अशा वेळी कितीही महाग प्रसाधने वापरा तरीही घाम हा येतोच. म्हणून यावर उपाय म्हणून मेकअप करण्याअगोदर चेहऱ्यावर बर्फ फिरवा आणि नंतर मेकअप करा. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक काळ घाम न येता टवटवीत राहील.

शिवाय फर्फ फिरवल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अवाढव्य चरबी ही निघून जाते. त्यामुळे चेहरा रेखीव दिसतो. शिवाय ज्यांचे वय वाढत चालले आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत अशांनी ही चेहऱ्यावर बर्फ फिरवा त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्यावर बर्फ घासल्याने चेहऱ्याच्या त्वचेचा चांगल्या प्रकारे मसाज होतो आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा नसा मधील रक्त प्रवाह व्यवस्थित होतो. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच पुरळ आणि मुरूम येत असतील तर त्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा बर्फ जेव्हा आपण चेहऱ्यावर घासतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपना कमी करतो त्यामुळे मुरूम येण्यास प्रतिबंध येतो.

कामाच्या जास्त ताण तणाव मुळे कधी कधी तुमचे डोळे खाली सुजल्यासारखे दिसतात त्यासाठी बर्फ घासा त्यामुळे सूज कमी होईल.

Please follow and like us:

Related Articles

3 comments

Richard Roe July 11, 2017 - 9:59 pm

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumque nihil impedit quo minus id quod maxime placeat facere.

Reply
Richard Roe July 11, 2017 - 9:59 pm

Quis autem vel eum iure reprehenderit qui in ea voluptate velit esse quam nihil.

Reply
Richard Roe July 11, 2017 - 10:00 pm

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore.

Reply

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!