Home कथा Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०५ प्रॉमिस डे

Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०५ प्रॉमिस डे

by Patiljee
548 views

आईला समोर पाहताच मी दचकलो त्यात तिने नजरेने जो कटाक्ष टाकला ते पाहूनच मी घाबरलो होतो पण आई जास्त काही बोलली नाही. पण तिच्या नजरेतून हे मला कळून चुकलं होतं की तिला काय म्हणायचे आहे. मनात नसताना सुद्धा मी तृष्णाला निरोप दिला. आज ती खूप खुश होती कारण माझी भेट निर्विघ्न झाली पण तिला हे माहीत नव्हतं की ती घरातून गेल्यावर आई माझ्यावर बरसणार आहे.

ती घराबाहेर पडताच आई जवळ आली माझ्याशी उष्याशी बसली. “पोरा एकच सांगणे आहे, हे बाळ वयातले प्रेम खूप वंगाळ असते बघ, त्याचं पुढे जाऊन काहीच होत नाही हाती लागते तो फक्त निराशा, त्यामुळे प्लीज तूषनाचा विचार सोडून दे कारण ती मोठ्या बापाची मुलगी आहे गडगंज श्रीमंत, हे आपल्याला नाही झेपणार मुला, अजून वेळ निघून गेली नाही भानावर ये” असे मायेने बोलून आई माझे उत्तर न ऐकताच निघून गेली.

तसे पाहायला गेलं तर आई जे काही सांगत होती ते सर्व खरं होतं. त्यात आम्ही दोघं आता लहान होतो, म्हणजे हे वय शिक्षणाचे मग मी कुठे भरकटत चाललोय असा प्रश्न मी माझ्या मलाच विचारला तर माझाच मला राग आला. मी खूप चुकीचं वागत होतो कारण पाहायला गेलो तर तृष्णाच कुटुंब पंचक्रोशीत नावाजलेले होतं आणि आम्ही मिडल क्लास कुटुंबातले. कशी जमणार होती जोडी. तेव्हा ठरवलं आज पासून तृष्णाचा नाद सोडेन.

सकाळी उठलो तर काळ पेक्षा हात बरा वाटतं होता. कुणाचेही न ऐकता मी शाळेसाठी रवाना झालो. गेटच्या बाहेर मागून तृष्णाचा आवाज कानी आला, “महेंद्र थांब” पण मी तिचे काहीही ऐकले नाही आणि पुढे निघून गेलो. तुला माझे वागणं वेगळं वाटलं खरं पण तिने सुद्धा जास्त प्रश्न विचारले नाही. वर्गात येऊन बाजूला बसली, एकटीच माझ्याशी बोलत होती आणि की हा, हो, ओके, ठीक, छान एवढच बोलत होता.

तिला कळलं होतं माझं कुठेतरी बिनसलं आहे पण नक्की काय हे तिलाही कळलं नव्हतं. संपूर्ण दिवस मी एकदाही तिच्याकडे पाहिले नाही किंवा तिच्याशी बोलायला गेलो नाही. त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. शाळा सुटल्याची घंटा झाली आणि मी एकट्याने घरचा रस्ता धरला. ती धावत धावत माझ्या मागे आली, दोन्ही हाताने धरून मला विचारले ” तुझं चाललेय काय नक्की? काय प्रॉब्लेम आहे? बोलशील तेव्हाच कळेल ना? असे गप्प होऊन काही होणार आहे का?

माझ्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडलं, ” थांबुया आपण इथेच कारण या नात्याचे पुढे जाऊन काहीच होणार नाहीये. माझे वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात अलगद पाणी आलं. काय म्हणतोस थांबुया इथे म्हणजे, आधी स्वतःचा लळा लावायचा आणि मग म्हणायचे थांबुया.. वा चांगलं आहे तुझे. आणि असे करण्या मागचे कारण मला कळेल का”? मी आईने सांगितलेल्या गोष्टी तिला सांगून टाकल्या. कशी आपल्या कुटुंबात तफावत आहे हे समजून दिलं.

माझं बोलणं ऐकून ती जोरात हसली आणि म्हणाली, बावळट आहेस का? एवढी छोटी गोष्ट आहे आणि तू नातं तोडायला निघालास. तुला माहित आहे आज काय आहे? आज ११ फेब्रुवारी आहे म्हणजेच प्रॉमिस डे. आणि तुला प्रॉमिस करायला आजच्या सारखा दिवस मला मिळणार नाही. तर महेंद्र गुरुनाथ पाटील मी तुम्हाला प्रॉमिस करते की जो पर्यंत माझे आयुष्य आहे तोपर्यंत ही तृष्णा फक्त आणि फक्त तुझीच असेल. कितीही संकटे आली, कितीही वाईट प्रसंग ओढावला तरी नेहमी मी तुझ्या सोबत असेल मग ते सुख असो किंवा दुःख ही वेडी तुझी आहे आणि आयुष्भर तुझीच असेल. आणि हो मला तृष्णा वसंत म्हात्रे हे माझं नाव तृष्णा महेंद्र पाटील असेच करायचं आहे. कळलं का ठोंब्या?

एवढे म्हणत ती लाजली आणि माझ्या डोक्यावर टपली मारत तिच्या घराकडे वळली. मी फक्त तिच्याकडे पाहत बसलो. किती स्पष्ट मते आहे हीची माझ्याबद्दल, नाहीतर मी पुढे काय होणार याचा विचार करत आताच काळजी करत आहे. ती तर आतापासून माझी बायको होण्याची स्वप्न बघतेय, खरंच माझं खूप चुकलं. आता उद्या हग डे आहे ना बघ कसा मस्त सरप्राईस देतो माझ्या वेडीला.

कथेचा सहावा भाग हग डे इथे क्लिक करून वाचा.

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Valentine's Week कथा मालिका | चाप्टर ०४ टेडी डे » Readkatha February 15, 2022 - 1:50 pm

[…] कथेचा पाचवा भाग प्रॉमिस डे इथे क्लीक क… […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल