प्रिय नवरोबा,
आज वटपौर्णिमा, पाहायला गेलो तर जगात सध्या कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. वडावर जाऊन तुझ्यासाठी उपवास करण्यासाठी हा वर्ष तरी नाही जमणार. तसे पाहायला गेलो तर दरवर्षी न विसरता मी तुझ्यासाठी उपवास करतेय. तूच मला सात जन्म नवरा मिळावा म्हणून हा अट्टाहास, पण मला ह्या प्रश्नांचे कोडे सुद्धा आहेच की तुलाही मी सात जन्म हवी आहे का? आणि तसेही पुनर्जन्म असतो की नाही ह्याच्यावर माझा फारसा विश्वास तर नाहीच आहे.
पण माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी हा उपवास करते. त्यात महत्त्वाचे म्हणजे माझे डायेट सुद्धा होते. दरवर्षी आम्ही बायका त्या बिचाऱ्या वडाळा बांधून घेतो. पण ह्यात सुद्धा माझी नेहमी हीच तक्रार होती की जसे मी त्या वडाळा बांधतो तसे तुला बांधून माझ्याजवळ ठेऊन तुझा पूर्ण वेळ मलाच मिळाला असता तर किती भारी झालं असतं ना? सुदैवाने माझी ही गोष्ट खरी ठरली आणि तुला तुझ्या कामापासून सुटका मिळून घरात बसण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळाला. लॉक डाऊन मुळे अनेक महिने झाले तू घरी आहेस.
आधी खूप आनंद झाला मला की एवढे दिवस सोबत तू घरी असणार, कधी वेळात वेळ काढून माझ्यासाठी तुझ्या हाताने बनवलेला चहा देणार, स्वयंपाक घरात मी जेवण बनवत असताना तिथे येऊन माझ्याशी गप्पा मारणार. आधी आपण हीच तर स्वप्ने पाहिली होती ना रे? मग जसजसे लग्नाला अनेक वर्ष होत गेली मग ह्यात तुझ्यात बदल का झाला? आपले बाहेर फिरणे बंद झाले, सिनेमा गृहात जाऊन सिनेमे पाहणे बंद झाले, आधी तर आपण प्रत्येक महिन्याला सिनेमा पाहायला जायचो मग आता काय झालं?
लॉक डाऊनमध्ये तुझा पूर्ण वेळ त्या मोबाईल मध्ये जातोय, तक्रार नाहीये रे पण त्या वेळातून थोडा वेळ माझ्या वाट्याला आला तर मलाही बर वाटेल. लग्नाआधी जॉब करणारी मी लग्नानंतर आपल्या घरासाठी जॉब सोडून घरात राहिले, कारण मलाही मुलांकडे पाहायचे होते. त्यांना वेळ द्यायचा होता. तुला कामावर नीट लक्ष देता येईल, मुलांकडे जास्त पाहावे लागणार नाही म्हणूनच तर मी हा निर्णय घेतला होता.
कधीतरी एक दिवस म्हण ना रे की बायको ये आपण आज सिनेमा पाहूया सोबत, खरंच ऐकून बर वाटेल रे, लॉक डाऊन आहे त्यामुळे घारातना बाहेर तर जाऊ शकत नाही पण घरी राहून मी तुझ्यासाठी काहीतरी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न तर करतो. असे म्हण ना एकदातरी, आज आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण मी कशाचीही अपेक्षा केली नाही. पण आज एक अपेक्षा नक्की करेल. घरी आहेस, खूप वेळ आहे, परत हे सर्व चालू झाल्यावर तू तुझ्या ऑफिसच्या दुनियेत व्यस्त होणार. त्या अगोदर मला वेळ दे ना रे. जरा त्या मोबाईलचा दुनियेतून बाहेर येऊन एकदा बायको कडे बघ तरी, तिची विचारपुस कर, तिला काय हवं आहे? काय नकोय? एकदा विचार तरी?
राहिला प्रश्न आजच्या वटपौर्णिमेचां तर बाहेर जाता न आले म्हणून काय झालं, मी ही पूजा घरात राहून करेल. तुला नको असली तरी मला मात्र सातोजन्मी काय तर पुढच्या प्रत्येक जन्मी नवरा म्हणून तूच हवा आहेस. कारण तुझ्याशिवाय आयुष्य खरंच खूप वेगळं आहे. फक्त खरंच खंत ह्या गोष्टीची राहील की हे तुला कधी कळणार? मान्य आहे मला माझ्या अंग काठीत खूप फरक पडला आहे. त्यामुळे तुला आता माझ्याकडे नजर टाकण्यापेक्षा बाहेर स्लिम मुलीकडे पाहण्यात जास्त रस असेल. पण हा विचार कधी केला आहेस का की मी ही आधी सड पातळ होते पण जेव्हा आपल्या मुलांना जन्म दिला तेव्हा माझ्यात हा बदल झाला आहे.
माझ्या मनातल्या भावना आहेत ह्या, नेहमी वाटतं तुझ्या समोर व्यक्त व्हावे पण मला नाही माहित ते शक्य आहे का नाही.
लेखक : पाटीलजी
1 comment
[…] वटपर्णिमेच्या दिवशी एका स्त्रीने नवऱ… […]