Home बातमी पैसा लाख कमवाल पण माणुसकी कमवायला शिका टाटा नंतर या कंपन्यांनी केली आहे सरकारला मदत

पैसा लाख कमवाल पण माणुसकी कमवायला शिका टाटा नंतर या कंपन्यांनी केली आहे सरकारला मदत

by Patiljee
258 views

मित्रानो आज प्रत्येक दिवसाला संक्रमित झालेल्या माणसांची संख्या वाढताना आपण पाहत आहोत. आपल्याला न्युज मधून सगळं समजत आहे. पण या सगळ्यासाठी आणि इतर काही गोष्टींसाठी सरकारवर जास्त भार पडत आहे अशा वेळी कोणीही असो मग तो सामान्य माणूस असो किंवा बॉलिवुड स्टार असो किंवा मोठं मोठे बिझिनेस मन जो तो आपल्याला होईल त्या प्रमाणे सरकारला या साठी मदत करत आहे.

त्यांचा प्रमाणे तुम्ही आम्ही सुध्दा ही मदत करू शकता. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही तर तुम्हाला होईल तितकीच मदत करा जेणेकरून याचा फायदा आपल्याच देशातील जनतेला होईल.

तुम्हाला माहीतच असेल काही दिवसांपूर्वी टाटा या कंपनीचे मालक रतन टाटा यांनी सरकारला यासाठी १५०० कोटींची मदत केली आहे. आता प्रत्येक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातच अजुन एक बिझिनेस मन विप्रो लिमिटेड १०० कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपये देऊ करणार आहे.

मुकेश अंबानी यांनी सुधा याकरिता मदत केली आहे. पंतप्रधान सहायता निधीसाठी त्यांनी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तर इन्फोसिस या उद्योग समूहाने १०० कोटीची मदत सरकारला देऊ केली आहे. त्याचप्रमाणे महिंद्रा या समूहाने कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे.

म्हणतात ना की पैसा तर महत्वाचा आहे पण त्याचबरोबर त्या माणसाची दान करण्याची वृत्ती त्याला अजुन पुढे जाण्यास मदत करते, पैसा कमावण्याची हिम्मत सगळेच दाखवतात पण त्यातील थोडा जरी पैसा दान करता आला तर त्याचे पुण्य त्याच्या वाट्याला नेहमीच मिळतात.

पण खंत ह्या गोष्टीची वाटत आहे ज्या स्वदेशी कंपनीकडे आपण नेहमी पाठ फिरवतो त्यांनीच सध्या मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. ज्या विदेशी कंपनी भारतात खूप जास्त कमाई करतात त्यांनी मात्र आपल्या देशासाठी तिळमात्र पैस्याची मदत केली नाहीये.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल