Home हेल्थ विना चप्पलेने चालत जाणे कोणाला आवडत नाही पण तसे केल्याने मिळतात कितीतरी फायदे

विना चप्पलेने चालत जाणे कोणाला आवडत नाही पण तसे केल्याने मिळतात कितीतरी फायदे

by Patiljee
216 views

आपण कुठेही जाताना नेहमीच पायात चप्पल घातल्याशिवाय बाहेर पडत नाही. एकतर ती आपल्याला सवय लागलेली असते किंवा पाय खराब होऊ नये म्हणून आपण चप्पल घालतो. पण हीच चप्पल न घालता चालणे हे एकतर आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप चांगले असते त्यामुळे हे आर्टिकल वाचल्यावर कमीत कमी घराच्या आसपास तरी थोडा वेळ चप्पल काढून चालाल.

आपल्या शरीरामध्ये असे काही प्रेशर पॉईंट आहेत त्यामुळे अनेक आजारांपासून तुम्ही मोकळे होऊ शकता. पण त्यासाठी ते प्रेशर पॉईंट रोज दाबायला हवेत. असेच काही पॉईंट आपल्या पायाच्या तळव्यांमध्ये ही असतात आणि त्यांवर सुधा दाब पडल्याने काही आजारांपासून आपल्याला आराम मिळतो.

पायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्यभागी आपल्या डोळ्यांचा पॉईंट असतो. त्यामुळे चप्पल न घालता चालल्यामुळे त्या पॉईंट वर दबाव आल्याने दृष्टी प्रभावित व्हायला लागते.

विना चप्पल ने चालल्यावर आपल्या शरीरातील रक्तपुरवठा अगदी उत्तम रित्या कार्य करते. सर्व शरीराला उत्तम रित्या रक्तपुरवठा होतो. त्यामुळे आपण आजारी कमी पडतो.

तुमचे जर रोज हिरव्या गवतावर सकाळी चप्पल न घालता चाललात तर याने तुम्हाला एक चांगला फायदा मिळतो तो म्हणजे जर तुमचे पाय रोज दुखत असतील तर यामुळे तुमच्या पायाच्या शिरांवर दबाव येईन त्याचे स्नायू मजबूत बनतात. शिवाय ज्या लोकांचे गुडघे ही वारंवार दुखत असतील त्यांनी हा प्रयोग नक्की करावा.

ज्या लोकांना अनिद्रा हा त्रास मोठ्या प्रमाणात असतो त्यांनी हा प्रयोग नक्की करावा. रोज सकाळी गवता वरून अनवाणी चालत जा. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक रित्या झोप येईल त्यासाठी झोपेच्या गोळ्या खायची गरज भासणार नाही.

तुम्ही जर न चुकता रोज अनवाणी गवतावरून चाललात तर त्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारी पडण्याची लक्षणे कमी आढळून येतात.

ज्या लोकांना मधुमेह आणि उच्च तसेच निम्न रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांनी हे करावे त्यांना नक्की फायदा होईल.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल