Home करमणूक Virajas Kulkarni Biography

Virajas Kulkarni Biography

by Patiljee
5735 views
Virajas Kulkarni

आदू, आदी, आदित्य हे नाव सध्या घराघरात पोहोचले आहे. माझा होशील ना ह्या मालिकेत मुख्य भूमिका करणारा आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) लाखो मुलींच्या गळ्यातले ताईत बनला आहे.अनेक मुली तर त्याला सोशल मीडियावरून प्रपोज सुद्धा करत आहेत. काहींनी तर त्याचाच डीपी स्वतःच्या प्रोफाईलवर लावला आहे.

झी मराठी ची मालिका माझा होशील ना सध्या लोकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. मग सई आणि आदित्य असो किंवा त्याचे मामा असो, किंवा त्यांची खट्याळ मैत्रीण असो, नाहीतर ये झिरो करणारे सईचे बाबा तर कधी नेहमीच सुंदर आणि भाव खाऊन जाणारी सईची आई असो. सर्वांचे काम वाखाडण्याजोगे आहे.

विराजस कुलकर्णी बद्दल सांगायचे झाले तर त्याचा जन्म पुण्यात झाला आहे. आपण जरी त्याला अभिनय करताना पाहत आलोय पण त्याने दिग्दर्शक, लेखक, ह्यात सुद्धा आपले नाव कमावले आहे. त्याला जादू करायला सुद्धा जमते. म्हणजे तो जादूगार आहे असेही म्हणायला हरकत नाही.

ह्या आधी त्याने माधुरी, हॉस्टेल डेज आणि ती आणि ती चित्रपटात सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. त्याच स्वतःच असे थेटर ग्रुप आहे ज्याच नाव थेट्रोन एन्टरटेन्मेंट आहे. त्याने अनेक नाटकात सुद्धा कामे केली आहेत. अनाथेमा हा नाटकापासून त्याने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ह्या क्षेत्रात प्रवेश केला होता.

पण विराजस बद्दल एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे तो प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी हीचा मुलगा आहे. मृणाल ह्यांनी आजवर अनेक चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सोनपरी म्हणून आपण आपल्या बालपणात सुद्धा आवडीने पाहिले आहे.

Virajas Kulkarni

सध्या माझा होशील ना ह्या मालिकेत सई आदित्यच्या घरी त्याचा मामाना भेटायला आली आहे. त्यामुळे काय धमाल होणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

हे पण वाचा तुमची सर्वांची लाडकी सई आहे ह्या मराठी अभिनेत्रीचा बहीण

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल