Home बातमी तुफान व्हायरल होत आहे या भाजी वाल्याचा फोटो बघा त्यामागील सत्य

तुफान व्हायरल होत आहे या भाजी वाल्याचा फोटो बघा त्यामागील सत्य

by patiljee
5851 views

सध्या लॉक डाऊन ४ चालू आहे आणि खर आहे या काळात कोणाचे काम सुटले आहे तर कोणाचा पगार ही मिळाला नाही आहे. त्यामुळे श्रीमंत लोक सोडून सध्या सगळ्यांचीच पैशाची अडचण आली आहे. यामुळे रोजच्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी ही लोकांजवळ पैसा उरला नाही. काही लोक मदत करतात पण ती ही फोटो काढून. गरीब लोकांना मध्यमवर्गीयांची यात खूप जास्त गळचेपी होत आहे. त्यामुळे त्यांच्या या गरजेसाठी काही लोक ही आपला छोटासा का होईना एक हात पुढे करतात जेणेकरून या काळात लोकांना थोडासा आधार मिळेल.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, कोण श्रीमंतांचा हा फोटो नाही की कलाकाराचा नाही हा फोटो आहे एका भाजीवाल्याचा, आता तुम्ही म्हणाल एक भाजी वाल्याचा फोटो का बर इतका व्हायरल झाला आहे? तुम्हीच फोटो बघून बघू शकता या भाजीवल्याच्या मनाचा मोठेपणा भरपूर लोक अशी मदत करतात पण आपल्याजवळ त्यांच्यासारखे भरघोस पैसे ही नाहीत असे असताना ही त्याच्या मनाचा इतका मोठा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतो आहे.

हा फोटो संभाजीनगर मधील आहे. पण त्याची पुरेशी माहिती मिळाली नाही आहे पण त्याने या काळात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. आपल्याला त्याच्याकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची एक भाजीची गाडी आहे आणि त्यावर त्याने पाटी लीहाली आहे त्यावर लिहले आहे की, जे विकत घेऊ शकतील त्यांनी घ्या आणि जे खरंच अडचणीत असतील त्यांनी भाजी मोफत घेऊन जा.

फोटोला अनेक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कारण कधीतरी अशा वृत्तीची लोक आपल्याला पाहायला मिळतात. जो व्यक्ती ही भाजीची गाडी चालवतो आहे तो काही श्रीमंत तर दिसत नाही गरीबच असणार पण तरीही त्याने या पडत्या काळात ज्याची ज्यांची मदत केली आहे तो लोक त्याला मनापासून आशीर्वाद देत असतील.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!