Home खेळ/Sports ज्या व्यक्तीला स्पर्श केल्यास तुटू शकतात त्याची हाडे अशा फॅनला भेटायला गेला विराट कोहली

ज्या व्यक्तीला स्पर्श केल्यास तुटू शकतात त्याची हाडे अशा फॅनला भेटायला गेला विराट कोहली

by Patiljee
92 views

पूजा शर्मा ही वयाने 24 वर्षाची असून तिला ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा नावाचा रोग झाला आहे. यामध्ये तिला कोणीही स्पर्श केल्यावर तिची हाडे मोडून जातात. आणि पुन्हा एक दोन दिवसात हीच हाडे आपोआप जुळली जातात. पूजा शर्मा हिने एक दिवस विराट कोहली सोबत बोलताना म्हटले की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमच्या सगळ्याच मॅच पाहते मी पहिल्यांदा स्टेडियम मध्ये जाऊन मॅच पहिली आहे तुमच्याशी भेटून आज मी खूप खूष आहे आज तुमच्याशी भेटण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे.

Source Google

पहिलं तर कोहलीची ही फॅन पूजा शर्मा दिव्यांग आहे ती इंदोर या शहरात राहते आहे. 12 पर्यंत तिचे शिक्षण ही झाले आहे. आता मात्र तिच्या आजारामुळे ती पुढील शिक्षण घेऊ शकत नाही आणि आता ती घरातच असते. पूजा टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी इंदोरच्या स्टेडियम मध्ये पोहचली होती. तिची फक्त एकच इच्छा होती ती म्हणजे विराट कोहली शी भेट घेण्याची ती खूप टाईम आपल्याच खुर्चीवर बसून राहिली तिला फक्त विराट शी भेट घ्यायची होती.

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली बांगलादेश विरोधात टेस्ट मॅच जिंकल्यावर आपल्या स्पेशल फॅन पूजा शर्मा हिला भेटला आणि तिचे स्वप्न पूर्ण केले. करून टाकले. कोहली ने ही तिच्याबद्दल विचारपूस केली त्यानंतर तिला एक कॅप दिला त्यावर त्याने स्वतः आपले ऑटोग्राफ केले शिवाय तिच्यासोबत फोटो ही काढले गेले. तिचं म्हणणं आहे की आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण मी आज अनुभवला.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल