काही दिवसापासून शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवाग ह्यांच्यात शाब्दिक वार ऑनलाईन दिसून येत आहेत. शोएबच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्याने वीरेंद्र सेहवाग ह्याला असे म्हटले होते की विरू तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत तेवढी संपती माझ्याकडे आहे. ही गोष्ट जरी मस्तीत शोएब ने बोलली असली तरी ह्या अगोदर वीरेंद्र सेहवाग ने शोएबला असे म्हटलं होत की पैसे कमावण्यासाठी शोएब भारताची वाह वाही व्हिडिओ मध्ये करतो. ह्या विधानामुळे दोघांच्यात शाब्दिक चकमकिला सुरुवात झाली.
त्या दोघांही खेळाडूंच्या नुसार आम्ही चांगले मित्र आहोत आणि मस्तीत अशा गोष्टी बोलत असतो असे सांगण्यात आले आहे. पण जर आपण दोघांच्या संपत्तीचा विचार केला तर वीरेंद्र सेहवाग शोएब अख्तरच्या बाबतीत खूप पुढे आहे. अख्तरचे काही न्यूज चॅनल सोबत कोलॅब आहे. तर त्याचे युट्यूबवर स्वतः च्या नावाचे चॅनल सुद्धा आहे. मात्र ह्या विरूद्ध सेहवाग ह्यांची इन्कम वेगवेगळ्या भागातून येत असते त्यामुळे इथे पगडे वीरेंद्र सेहवागचे जड आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार विरूची संपती ३०० करोड आहे. वीरेंद्र सेहवाग समालोचन, जाहिरात आणि कोचिंग सुद्धा करतात. त्यामुळे एक भलीमोठी रक्कम त्या विभागातून येते. त्याचे स्वतःचे असे सेहवाग इंटरनॅशनल स्कूल आहे. तिथून पण चांगली रक्कम त्याला मिळत असते. २०१५ मध्ये क्रिकेटमध्ये सन्यास घेतला असला तरी त्याची लोकप्रियता तिळमात्र कमी झाली नाहीये. मागील वर्षात म्हणजे २०१९ मध्ये विरूने ४१ करोडची कमाई केली होती.
शोएब अख्तरची कमाई आपण पाहिली तर त्याची कमाई १६३ करोड आहे. म्हणजेच वीरेंद्र सेहवागच्या कमाईच्या अर्धी पण नाही. ह्या मिळत असलेल्या कमाई मध्ये यूट्यूब कमाई सुद्धा मिळवली आहे. म्हणजेच शोएबच्या यूट्यूब चॅनेलवर ५०% व्ह्यू हे भारतातून जात असतात. म्हणजे ह्या कमाईत सुद्धा भारतीयांचा खूप मोठा वाटा आहे.