Home संग्रह श्रावण महिन्यात फक्त शाकाहारी का खाल्ले जाते?

श्रावण महिन्यात फक्त शाकाहारी का खाल्ले जाते?

by Patiljee
39214 views
श्रावण

सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सणांची यात्राच चालू होते. म्हणजे आपल्या सणांना सुरुवातच श्रावण महिन्यात होते. अशा या श्रावण महिन्यात आपल्याकडे फक्त शाकाहारी खाल्ले जाते. म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. पण नक्की मांसाहार का खात नाहीत या महिन्यात? हे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आपण हेच पाहणार आहोत.

श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो. याच्या पौर्णिमेला चंद्र श्रावण नक्षत्र मद्ये असतो. त्यामुळे या महिन्याला श्रावण असे म्हणतात. आता श्रावणात मच्छी मटण खाणे का बंद केले जाते? त्यासाठी महत्वाचे कारण म्हणजे पावसाळ्यात वातावरण सगळीकडे थंड असते. वातावरणात गारवा असतो. त्यामुळे हवेत बॅक्टेरिया वाढलेले असतात.

याउलट उन्हाळ्यात उन्हाच्या सूर्य प्रकाशात हे जीव जंतू मारले जातात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे लोक बिनधास्त मटण मच्छी खाऊ शकतात. आणि म्हणून श्रावण महिन्यात मांसाहार खाल्ल्याने अनेक रोगांना आपणच आमंत्रण देतो हे जाणून घ्या.

पावसाळ्यात बघायला गेलात तर सगळीकडे हिरवळ दाटून आलेली असते. पण दुसरी बाजू पहिली तर आजारी पडण्याची शक्यता ही जास्त असते. आणि म्हणून या महिन्यात आपण जे काही खातो ते जपून खायला हवे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशांना तर खूप काळजी घेणे गरजेचे आहे. आणि म्हणून आयुर्वेद नुसार आपण घेणार असणाऱ्या आहाराच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

श्रावण महिन्यात आपली प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे मांस खाताना त्यात असलेले किटाणू आपल्या शरीरात जाऊन आपण आजारी पडू शकतो. याशिवाय माशांची प्रजनन करण्याची वेळ याच महिन्यात असते त्यामुळे मच्छी खाण्यास ही वर्ज्य असते.

हे पण वाचा श्रावण महिना का विशेष असतो? कधी विचार केला आहे का? नक्की वाचा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल